प्रश्न मराठीचे…

मराठी भाषा जगतेय की मरतेय ?
मराठीचं भवितव्य काय ?
अभिजात मराठीचं काय होणार ?

हे आणि असेच बरेच प्रश्न मराठीच्या नावाने राजकारण करताना अनेकांना आधार देतात. दरवर्षी येणार्‍या पावसाळ्याप्रमाणे `मराठी भाषा दिन’ जवळ आला की यासारख्या प्रश्नांच्या पुड्या सोडल्या जातात आणि एकदा का तो मराठीचा उत्सव साजरा झाला की पुन्हा वर्षभर त्याच पुड्या बांधून बाटलीबंद होतात.

भाषासक्ती व्हायलाच पाहिजे…
मराठी भाषा भवन मुंबईतच हवे…
साहित्य संमेलनासाठी सरकारचा निधी वाढवलाच पाहिजे…

यासारख्या मागण्यांच्या गर्जना निवडणूकांच्या तोंडावर होतात… मोर्चे निघतात…  आंदोलने होतात… सरकारी समित्या स्थापन होतात… त्यावर वर्णी लावण्यासाठी स्पर्धा सुरु होतात…

आणि एकदा का हे झालं की परत त्या गर्जना बंद होतात… शाब्दिक तलवारी म्यान होतात…

मराठी लेखक बेस्टसेलरचं लेबल का लावत नाहीत ?
मराठी पुस्तकांची आवृत्ती फक्त १०००चीच का ?
मराठीत पेपरबॅक पुस्तकांची संख्या अत्यल्प का ? 
मराठी लेखक वैश्विक का होत नाहीत ? 

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आहे या उपक्रमात….

आपला सहभाग अत्यावश्यक आहेच….

 


मुख्य पान | प्रकल्पाविषयी | मराठीसृष्टी विषयी | सहभागी व्हा | प्रश्न मराठीचे… | समस्या व उपाय | संपर्क