प्रकल्पाविषयी

मराठी भाषेतील उत्तमोत्तम माहितीचा संग्रह करुन तो कायमस्वरुपी इंटरनेटवर जतन करण्यासाठी हा प्रकल्प आहे.

कोणतीही संग्रहित माहिती केव्हाही गुगलद्वारे शोधता येण्याची सोय आणि माहिती कायमस्वरुपी इंटरनेटवर संग्रहित ठेवणे
ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये…

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

  • १ मिलियन म्हणजेच १० लाख मराठी पाने संग्रहित करणे.
  • संग्रहित पानांचे गुगल इन्डेक्सिंग करुन माहितीचा शोध सोपा करणे
  • फेसबुक आणि व्हॉटसऍपवरील हजारो लेखकांना त्यांचे स्वतःचे, स्वतंत्र लेखन व्यासपीठ उपलब्ध करणे.
  • इंटरनेटवर विखुरलेल्या मराठी लेखक-साहित्यिकांना तंत्रज्ञानविषयक मदत करणे.
  • मराठीतील अद्ययावत तंत्रज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध करणे
  • सोप्या पद्धतीने टायपिंग, फॉन्ट कन्व्हर्जन, ओसीआर वगैरेसारखी कामे करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करणे.
  • मराठी लेखन आणि प्रकाशनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांमध्ये समन्वयासाठी यंत्रणा उभी करणे.

१० लाख पानांचा संग्रह कसा करणार ?

पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या मराठीसृष्टी डॉट कॉम आणि तिच्या इतर सहयोगी वेबपोर्टल्स आणि
वेबसाईटसच्या माध्यमातून ३००,००० पेक्षा जास्त पानांचा संग्रह
या क्षणाला ऑनलाइन आहे आणि हजारो वाचक त्याचा उपयोग करत आहेत.

मराठीतील सर्व प्रकाशित पुस्तकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करणारे पोर्टल लवकरच लॉन्च केले जात आहे.

विविध क्षेत्रातील मराठी व्यक्तींची माहिती देणारा `मराठी व्यक्तिकोश‘ प्रकल्प मराठीसृष्टीवर संकलित होत आहे.

५०,००० पेक्षा जास्त मराठी आडनावांचा संग्रह, आडनावांच्या माहितीसहित मराठीसृष्टीवर संकलित होत आहे.

याशिवाय…

  • विविध विषयातील तज्ज्ञांना पायाभूत सुविधा देऊन त्यांच्या विषयांवरील मराठी वेबसाईटस बनवण्याची यंत्रणा तयार आहे आणि अशा सुमारे २०० पेक्षा जास्त वेबसाईटस आकाराला येत आहेत.
  • सुप्रसिद्ध असोत की अप्रसिद्ध, प्रकाशित असोत की अप्रकाशित, ज्ञात असोत की अज्ञात, सध्या हयात असोत की गतकाळात होऊन गेलेले असो, सर्व मराठी साहित्यिकांची वेबपेजेस उपलब्ध करणारे `मराठी साहित्यिक’ हे पोर्टल तयार होत आहे.
  • लेखक व साहित्यिक, पत्रकार, वृत्तपत्रलेखक अशा लेखनाशी संबंध असलेल्या कोणासाठीही वेबसाईटस तयार करण्यासाठी यंत्रणा तयार असून अनेक लेखक याचा फायदा घेत आहेत.

अशा विविध माध्यमातून ही पाने संग्रहित होत आहे.

 


मुख्य पान | प्रकल्पाविषयी | मराठीसृष्टी विषयी | सहभागी व्हा | प्रश्न मराठीचे… | समस्या व उपाय | संपर्क