इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब आता तिशीत आलंय…. अक्षरश: करोडो पानं या महाजालावर आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडतेय.  लाखोंच्या संख्येने वेबसाईटस सुद्धा या महाजालावर आहेत.

पण यात आपली मायबोली मराठी कुठे आहे?

हाच प्रश्न आपल्यापैकी बरेचजण, वर्षानुवर्षे एकमेकांना विचारत आहेत… पण याचं उत्तर मिळतं ते म्हणजे…

`एखाद्या महासागरात एखाद्या बादलीभर पाण्यापुरती.. ‘

नाही म्हणायला फेसबुकवर आजकाल बरेचजण मराठीत व्यक्त व्हायला लागलेत…  व्हॉटसऍपसुद्धा मराठी मजकूराने ओसंडून वाहातेय..

मात्र फेसबुक आणि व्हॉटसऍपवरच्या मजकूराचा कायमस्वरुपी संग्रह होत नाही…. मजकूर शोधणे कठीण जाते…

विकिपिडिया.. ज्याला जगातील सर्वात मोठा मुक्त माहितीसंग्रह मानले जाते, त्यातही मराठी पानांची संख्या जेमतेम ५०,००० च्या आसपास घुटमळतेय…

वेबसाईटस, ब्लॉग्स, ऑनलाईन वर्तमानपत्रे, नियतकालिके यामध्ये मराठीची स्थिती काही फारशी सुखद नाही..

मात्र या सगळ्याची वेगवेगळी कारणे आहेत… त्याकडे न जाता ही परिस्थिती कशी सुधारता येईल ते बघणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त मराठी मजकूर इंटरनेटवर कायमस्वरुपी साठवणे आणि त्यातून नेमका हवा तो मजकूर शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही मोठी गरज आहे,

Mission1M हे त्याच दृष्टीने उचललेले पाऊल आहे. गेली २५ वर्षे मराठी वाचकांच्या सेवेत असलेल्या `मराठीसृष्टी’ (www.marathisrushti.com) या लोकप्रिय मराठी वेब पोर्टलच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु केलेला आहे आणि माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक समविचारी व्यक्तींचा या उपक्रमात सहभाग आहे.


मुख्य पान | प्रकल्पाविषयी | मराठीसृष्टी विषयी | सहभागी व्हा | प्रश्न मराठीचे… | समस्या व उपाय | संपर्क